जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला बियाणे तुटवड्याचा मुद्दा

जिल्हा परिषद

सदस्यांना धरले कृषी विभागाड्या अधिकार्‍यांना धारेवर

अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 22) घेण्यात आली.

या सभेमध्ये जिल्ह्यातील कपाशी बियाण्याच्या तुटवड्याचा मुद्दा चांगलाच गाजला.

जिल्हा परिषद सदस्यांनी या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला धारेवर धरुन जिल्ह्यातील

वास्तविक परिस्थिती सभागृहासमोर मांडली. याशिवाय या सभेमध्ये ग्रामीण भागातील पाणीपुरवठा

व इतर महत्त्वाचे विषयांवर चर्चा झाली.
जिल्ह्यात कपाशीच्या अजित 155 व अजित 5 या बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे

. शेतकरी बियाणे केंद्रांवर रांगा लावून उन्हातान्हात उभे राहतात पण त्यांना बियाणे मिळत नाही

. याबाबत शिवसेना गटनेते गोपाल दातकर यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला.

त्यावर कृषी अधिकारी यांनी उत्तर देतांना सांगितले की गेल्या वर्षीपेक्षा

यावर्षी कपाशी बियाण्याची मागणी जास्त प्रमाणात करण्यात आली होती.

परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अजित 155 व अजित 5 चे कपाशीचे बियाणे

अर्ध्यापेक्षाही कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

त्यामुळे या बियाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे.

तरी इतर जिल्ह्यांमधून या बियाण्यांच्या पाकिटांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

बियाण्यांसोबतच खतांचे लिंकिंग केल्या जात असल्याचेही सभागृहात सदस्यांनी

सांगितले. बियाणे दुकानदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

एक बियाण्याची बॅग पाहिजे असेल तर त्यासोबत दुसरी बॅग घेण्याची जबरदस्ती केली जात आहे

किंवा एखाद्या खताच्या बॅग सोबत दुसरी खताची बॅग घेण्याची जबरदस्ती केली जात आहे.

याबाबत गोपाल दातकर यांनी सभागृहासमोर माहिती दिली.

त्यावरही कृषी अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईची परिस्थिती अत्यंत भीषण

असल्याबाबत चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सभागृहात जाब विचारला.

जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असतांना देखील जिल्हा परिषदेच्या

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य आणि बेजबाबदार कारभारामुळे ग्रामीण

भागातील लोकांना पिण्याला पाणी मिळत नाही. काही गावांमध्ये महिनाभर पाणी मिळत नाही.

काही ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीसाठी खड्डे खोदून ठेवण्यात आले, मात्र दुरुस्ती करण्यात येत नाही.

रस्त्यात खड्डे खोदल्याने नागरिकांना व जनावरांना धोका निर्माण झालेला आहे.

दुरुस्तीसाठी पाईप रस्त्यात टाकून ठेवण्यात आले, त्यामुळेही

अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत सदस्यांनी सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला

तेव्हा लवकर कामे सुरळीत करण्यात येतील,

असे आश्वासन दिले. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी

देखील सभागृहात ज्येष्ठ सदस्य गजानन पुंडकर यांनी मागणी केली.

त्यानुसार लवकर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

वृक्षारोपणात घोळ

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणामध्ये कशाप्रकारे घोळ झालेला आहे,

याबाबत सदस्यांनी सभागृहासमोर माहिती दिली.

त्यावर तीन सदस्यीय समिती द्वारा चौकशी करण्यात येणार आहे.

तसा निर्णय सभागृहात घेण्यात आला. निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा गाजला

जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा मुद्दा बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये गाजला.

मुलांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असल्याबाबत यापूर्वी सुद्धा तक्रारी आल्या होत्या.

मात्र आहार निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी असूनही या आहाराचा तपासणी

अहवाल मात्र स्टॅंडर्ड दर्जाचा आल्याने सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आले व

पुन्हा एकदा हा पोषण आहार तपासणीसाठी पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले…

https://ajinkyabharat.com/khamgaonwat-puna-dumping-ground-fire/