Iran-US Conflict : इराणने अमेरिकेचे F-15 फायटर जेट्स पाडले, कुवेतच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली

Iran-US Conflict

इराण-यूएस संघर्षातील तणाव अजून वाढला आहे. इराणने अमेरिकेचे एफ-15 फायटर जेट्स कुवेतमध्ये पाडल्याचा दावा केला असून, कुवेतच्या संरक्षण मंत्र्यांच्या कबुलीनंतर हा दावा खरा ठरला आहे. एएफपीच्या अहवालानुसार, सोमवारी, 2 मार्च रोजी सकाळी कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळावर अमेरिकन लढाऊ विमान पाडण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पायलट हवेतून बाहेर पडताना पॅराशूटसह दिसले. सर्व क्रू मेंबर्स वाचले असून, त्यांना ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

एफ-15 फायटर जेट जगातील सर्वात शक्तिशाली हवाई वर्चस्व राखणारे विमान मानले जाते. अमेरिकेसह इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्याकडे देखील हे विमान आहे. इराणने या विमानाला पाडून केवळ अमेरिकेला धक्का दिला नाही तर त्यांच्या मिसाईल क्षमतेचा प्रभावही दाखवला आहे.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/the-plight-of-rambhapur-fata-and-akot-road-the-displeasure-of-the-citizens/

Related News