हातरुण : शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत इक़रा स्कूल, हातरुणच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत इक़रा स्कूलने चार सामने खेळले, ज्यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.पहिला सामना इक़रा स्कूल हातरुण आणि संत गजानन कॉन्व्हेंट, परस यांच्यात झाला. या सामन्यात इक़रा स्कूलने प्रभावी खेळ करत विजय मिळवला.दुसऱ्या सामन्यात इक़रा स्कूलचा सामना जागेश्वर विद्यालय, वाडेगाव यांच्याशी झाला. या सामन्यातही इक़राच्या खेळाडूंनी उत्तम साखळी खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.उपांत्य फेरीत (सेमी फायनल) इक़रा स्कूलने नेशनल आर्मी, गाईगाव या संघाशी सामना केला. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला, मात्र इक़राच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.अंतिम सामना राजीव गांधी स्कूल, ची चिंचोली यांच्याविरुद्ध झाला. दोन्ही संघांनी जोरदार झुंज दिली, मात्र थोडक्यात पराभव पत्करावा लागला आणि इक़रा स्कूलला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.या संपूर्ण स्पर्धेत इक़रा स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अशरफ खान आणि शुएब खान सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीमुळेच संघाने उत्तम यश मिळवले.या यशामुळे शाळेतील शिक्षक, सेक्रेटरी शेख वसीम अहमद, विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून संघाचे कौतुक करण्यात येत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/tya-naradham-teacherla-fashi-danyachi-magani/