आयपीएस अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर

आयपीएस

सध्या सोशल मीडियावर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील व्हिडीओ कॉल मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार अंजना कृष्णा यांना काही मुद्द्यांवर सुनावत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका झाली आहे.

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले:

“सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेणे होते. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. कायद्याचं राज्य माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की,

“राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत, पण सध्या फक्त करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणावर चर्चा होत आहे. अजितदादांचा स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे महाराष्ट्राला ज्ञात आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. तरीही या संभाषणाला वेगळं वळण देऊन टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही नको त्या वादात तेल घालणार नाही, सरकारचे लक्ष खऱ्या प्रश्नांकडे वेधू.”

सध्या प्रकरणाची चर्चा जोर धरली असून, व्हिडीओ कॉलमधील संभाषण आणि दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/kutumbic-language-aani-set-yashcha-mysterious-confluence/