Preity Zinta : पंजाबच्या खेळाडूचं 10 किलोने वाढलंय वजन, सराव न करता गेम खेळतात; बातम्यांवर प्रीती झिंटा प्रचंड भडकली
Preity Zinta यांच्या मालकीच्या Punjab Kings संघात सध्या सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला दमदार कामगिरी करत सलग सहा सामने जिंकणाऱ्या पंजाब किंग्जची विजयी घोडदौड अचानक थांबली आणि संघ सलग चार सामने पराभूत झाला. या पराभवानंतर संघातील खेळाडूंविषयी अनेक धक्कादायक दावे सोशल मीडियावर आणि काही रिपोर्ट्समध्ये समोर आले. मात्र या सर्व बातम्यांवर आता प्रीती झिंटाने थेट संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्ज संघाने स्पर्धेच्या सुरुवातीला अप्रतिम खेळ करत चाहत्यांची मने जिंकली होती. संघाने सलग सहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. इतकंच नव्हे तर कोलकाताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने संघाला आणखी एक गुण मिळाला होता. त्यामुळे पंजाब किंग्ज १३ गुणांसह मजबूत स्थितीत होता. मात्र त्यानंतर संघाच्या कामगिरीत अचानक घसरण झाली आणि सलग चार सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
There’s a difference between criticism & calculated misinformation. Healthy debate around the game is welcome, but the deliberate spread of fake narratives to damage individuals, the team, or the brand should not & will not be taken lightly. I urge everyone including verified… https://t.co/yeqbsTwLBd
Related News
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 12, 2026
संघाच्या या खराब कामगिरीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की पंजाब किंग्जचे काही खेळाडू नियमित सराव करत नाहीत. काही जण पहाटेपर्यंत व्हिडिओ गेम खेळत बसतात, त्यामुळे फिटनेस आणि मैदानावरील प्रदर्शनावर परिणाम होत आहे. एवढंच नाही तर संघाचा युवा सलामीवीर Prabhsimran Singh याचं वजन गेल्या काही आठवड्यांत तब्बल १० किलोने वाढल्याचाही दावा करण्यात आला.
या बातम्यांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. पंजाब किंग्जच्या चाहत्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. काही जणांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले तर काहींनी खेळाडूंवर टीका सुरू केली. मात्र या सर्व घडामोडींनंतर प्रीती झिंटा स्वतः मैदानात उतरली आणि तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रीती झिंटाने एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “टीका करणं आणि जाणूनबुजून खोटी माहिती पसरवणं यात खूप मोठा फरक आहे. खेळाबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा संघाच्या ब्रँडबद्दल चुकीची माहिती पसरवणं स्वीकारलं जाणार नाही.”
तिने पुढे माध्यमांनाही थेट आवाहन केलं. “मी सर्व मीडिया प्लॅटफॉर्मना विनंती करते की अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करण्याआधी जबाबदारीने वागा. फक्त चर्चेत राहण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी बनावट कथा तयार करणं योग्य नाही,” असंही ती म्हणाली.
