IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होत आहे.

आयपीएलच्या इतिहासात टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Related News

आयपीएलच्या मेगा लिलावात ऋषभला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला साऊदी अरब येथील

जेद्दामध्ये आयपीएल 2025 च्या लिलावादरम्यान, मोठी रक्कम मिळाली होती.

स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएलमध्ये मोठी बोली लागलेल्या खेळाडूंन कर किती द्यावा लागतो? जाणून घेऊयात…
भारतीय खेळाडूंना 10 टक्के तर विदेशी खेळाडूंना 20 टक्के TDS कट केल्यानंतर आयपीएलमध्ये पैसे मिळतात.
पैसे मिळण्यापूर्वी फ्रँचायजी आणि बीसीसीआयसोबत खेळाडूंना समझोता करावा लागतो. सीए सुरेश सुराना सांगतात,
आयपीएलमधून मिळालेलं उत्पन्न त्यांच्या वर्षभरातील उत्पन्नाशी जोडून आयकर स्लॅबनुसार टॅक्स लावला जातो.
ज्या खेळाडूंवर मोठी बोली लागते त्यांना जास्त रक्कम द्यावी लागते. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांना सरचार्ज आणि
सेस सह 30 टक्के टॅक्स भरावा लागेल. ऋषभ पंतला लखनौने 27 कोटींन विकत घेतलंय.
मात्र, ही रक्कम 2025, 2026 आणि 2027 या तीन वर्षांसाठी आहे.
त्यामुळे त्याला एकाच वेळी ही रक्कम मिळणार नाही.
आयकर विभागाकडून ऋषभ पंतच्या कॉन्ट्रँक्टच्या रकमेतील 8.1 कोटी कर म्हणून भरावे लागतील.
त्यामुळे ऋषभ पंतला 3 वर्षांसाठी एकूण 18.9 कोटी रुपये मिळणार आहेत.

Related News