Samsung Galaxy S25 Edge ला देणार टक्कर
नवी दिल्ली : स्मार्टफोन बाजारात अल्ट्रा-स्लिम मॉडेल्सची स्पर्धा रंगताना दिसत आहे. सॅमसंगने नुकताच 5.8mm जाडीचा Galaxy S25 Edge बाजारात आणला आहे.
त्याला टक्कर देण्यासाठी अॅपल लवकरच आपला iPhone 17 Air लॉन्च करणार असून तो अजून पातळ म्हणजे सुमारे 5.44mm असल्याची माहिती लीक झाली आहे.
Galaxy पेक्षा अधिक पातळ iPhone
TechRadar च्या अहवालानुसार, iPhone 17 Air ची जाडी 5.0mm ते 6.0mm दरम्यान असू शकते.
यामध्ये 5.44mm, 5.5mm आणि 5.65mm अशी वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे.
म्हणजेच अॅपलचा हा मॉडेल सॅमसंगच्या Galaxy S25 Edge पेक्षा 0.15mm ते 0.35mm ने पातळ असू शकतो.
लीक फोटोमध्ये स्पष्ट फरक
टिप्स्टर @theonecid यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये iPhone 17 Air चा डमी युनिट Galaxy S25 Edge च्या शेजारी ठेवलेला दिसतो.
यात iPhone 17 Air हा Galaxy S25 Edge पेक्षा लक्षणीय पातळ असल्याचे स्पष्ट दिसून येते.
डिझाईनसाठी कॅमेरा आणि बॅटरीची तडजोड?
अल्ट्रा-स्लिम डिझाईन साध्य करण्यासाठी अॅपलने कॅमेरा फिचर्स आणि बॅटरी क्षमतेत काही प्रमाणात तडजोड केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
तरीही बाजारात सर्वात पातळ स्मार्टफोन म्हणून iPhone 17 Air ची ओळख होण्याची शक्यता आहे.
कधी लाँच होणार?
Apple कडून अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी iPhone 17 Air हा 2025 च्या शेवटच्या तिमाहीत किंवा 2026 च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतो
असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
किंमत किती असू शकते?
अंदाजानुसार iPhone 17 Air ची किंमत ₹80,000 ते ₹1,00,000 च्या दरम्यान असू शकते.
डिझाईन आणि प्रीमियम सेगमेंट लक्षात घेता किंमत जास्तही जाऊ शकते.
बाजारावर परिणाम
iPhone 17 Air आल्यास अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये मोठी चढाओढ होणार आहे.
Samsung आणि इतर ब्रँड्सना स्पर्धा देत Apple पुन्हा एकदा डिझाईन आणि प्रीमियम तंत्रज्ञानाच्या शर्यतीत आघाडीवर जाण्याची शक्यता आहे