इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट

इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट

इंझोरी | प्रतिनिधी

२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल्याने अंदाजे २०० एकरांहून अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Related News

यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या आधारावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.

मात्र नंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे काही शेतांतील बियाणे वाहून गेले, काही सडले, तर काही जमिनीखाली दबले.

परिणामी बियाण्याचा उगमच झाला नाही.

बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

बियाण्याची मागणी अचानक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काहींनी बियाणे मिळवून दुबार पेरणीस सुरुवात देखील केली आहे.

कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही

दुबार पेरणीची परिस्थिती गंभीर असतानाही कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

त्यामुळे ही माहिती अद्याप प्रशासनाच्या नोंदीत नाही.

शेतकऱ्यांचे म्हणणे

“माझ्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, पण २६ आणि २७ जुन रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही.

त्यामुळे पुन्हा बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी करत आहे. प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करणे आवश्यक आहे.”
रवी काळेकर, शेतकरी, इंझोरी

“यंदा पावसाला विलंब झाला. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून अल्पशा पावसावरच पेरणी केली.

मात्र नंतर आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बियाणे उगवलेच नाही. आता दुबार पेरणी करावी लागत आहे.

याची तक्रार लवकरच कृषी विभागाकडे करणार आहे.”

अशोक इंगोले, शेतकरी, इंझोरी

तत्काळ पाहणी आणि मदतीची गरज

स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की,

लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.

अन्यथा शेतकरी अधिक अडचणीत सापडतील.

Read Also :   https://ajinkyabharat.com/every-person-in-your-name-shindencha-sher-aani-jai-gujarat-azhane-churchna-udhan/

Related News