अंतराळात आनंदाचा क्षण!

अंतराळात आनंदाचा क्षण! सुनिता विलियम्स आणि डॉन पेटिट यांचा 'झिरो ग्रॅव्हिटी' डान्स व्हिडीओ व्हायरल

वॉशिंग्टन | प्रतिनिधी

अंतराळात चालणाऱ्या कठीण मोहिमा, तांत्रिक अडचणी आणि पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर एकाकी जीवनशैली…

या सगळ्यांमध्येही कधीकधी काही आनंदाचे क्षण झळकतात, आणि तसाच एक क्षण सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Related News

नासाचे अनुभवी अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि डॉन पेटिट सध्या चर्चेत आहेत.

त्यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (ISS) एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे,

ज्यामध्ये ते दोघेही शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात नृत्य करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतोय.

दोघांनीही अंतराळात असतानाही आपली सकारात्मकता आणि उत्साह कसा टिकवावा, हे दाखवून दिलं आहे.

अनेकांनी सोशल मीडियावर या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत “अंतराळातला आनंददायक क्षण” असं म्हटलं आहे.

अंतराळातही ‘लाइफ’ आहे!

या व्हिडीओमधून हे अधोरेखित होतं की, कठीण परिस्थितीतही थोडा आनंद,

हास्य आणि उत्सवाचं वातावरण निर्माण करणं शक्य आहे. ISS वरचा हा ‘डान्स’ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-juna-city-poa-savat-yuvar-jeevaghena-halla/

Related News