33/11 केव्ही उपकेंद्रांना आंतरराष्ट्रीय मानांकन – महावितरणच्या कामगिरीला गारूड

महावितरण

नागपूर महावितरणच्या चार उपकेंद्रांना आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ 9001:2015’ मानांकन

 नागपूर महावितरणच्या कामगिरीत आणखी एक गौरवशाली क्षण आलेला आहे. नागपूर परिमंडळातील सिव्हिल लाईन्स विभागातील चार प्रमुख 33/11 केव्ही उपकेंद्रांना त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन, तांत्रिक अचूकता आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसओ 9001:2015 प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.

या उपकेंद्रांमध्ये एम.आर.एस., बिजली नगर, नागभवन आणि सुगत नगर या चार उपकेंद्रांचा समावेश आहे, जे नागपूरमधील संवेदनशील सरकारी परिसराला वीज पुरवठा करतात. या मानांकनामुळे महावितरणच्या ‘सुसह्य जीवन’ (Ease of Living) संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी सिद्ध झाली आहे. यामध्ये केवळ वीज पुरवठा करणे नव्हे, तर अखंडित आणि दर्जेदार वीज ग्राहकांना देणे हा उद्देश प्राथमिक होता.

आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी उपकेंद्रांमध्ये कार्यप्रणालीत मोठे बदल करण्यात आले. यामध्ये रोहित्र (Transformers) आणि वीजवाहिन्यांची तपासणी व देखभाल, सुरक्षा प्रणालींचा नूतनीकरण, ग्राहक तक्रारी सोडवण्यासाठी पारदर्शक आणि वेगवान प्रक्रिया, तसेच कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक मानकांचे पालन यावर विशेष भर दिला गेला. उपकेंद्र परिसराचे सुशोभीकरण आणि व्यवस्थापन सुधारण्याचे कार्यही या प्रयत्नांचा भाग होते.

Related News

महावितरणने म्हटले आहे की, ही यशस्वी कामगिरी केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे नव्हे, तर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या स्वतःहून घेतलेल्या पुढाकारामुळे शक्य झाली. कर्मचाऱ्यांनी कामकाजात शिस्त आणली, सेवा सुधारण्यासाठी अतिरिक्त श्रम घेतले आणि टीम वर्कच्या माध्यमातून हा प्रकल्प यशस्वी केला.

नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि कार्यकारी अभियंता धम्मदिप फुलझेले यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला. विशेषतः अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत चौधरी आणि सहायक अभियंता जाफर अकबर यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या यंत्रचालक आणि दुरुस्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या उपकेंद्रांसाठी आयएसओ प्रमाणपत्र मिळवले. हे मानांकन मिळाल्याने नागपूरमधील वीज ग्राहकांचा महावितरणवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महावितरणने या यशस्वी कामगिरीसह भविष्यातही दर्जेदार, अखंड आणि सुरक्षित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.

‘आयएसओ 9001:2015’ मानांकन मिळालेली महावितरणची 33/11 केव्ही नागभवन उपकेंद्रे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

read also : https://ajinkyabharat.com/desi-jugaad-cows-injured-paella-tied-in-a-bottle-milk-production-got-amazing-1-benefit/

Related News