अकोटात पाच जण पहिल्याच प्रयत्नात तलाठी

अकोट : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २२ विद्यार्थ्यांची सैन्य दलात,सात मित्रांची आरोग्य विभागात,५ जणांची मंत्रालय लिपिक पदी अशा एकापेक्षा एक सरस निकालानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या तलाठी परीक्षेच्या निकालात अकोट मधील तरुणांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.अकोट शहरात एकाच अभ्यासिकेत अध्ययन करणाऱ्या पाच तरुणांची तलाठी पदी निवड झाली आहे. या पाचही विद्यार्थ्यांचा सत्कार अभ्यासिकेचे संचालक  प्रा.कैलास वर्मा यांनी केला असून हा निकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या निकालाची विशेषतः अकोट च्या इतिहासात भारतीय सैन्य दलात सहभागी होणारी पहिली मुस्लिम तरुणी रिना अंजुम शेख नाझीम हिची देखील अकोला तलाठी पदी निवड झाली आहे. या बरोबरच सागर गोमासे (धुळे)प्रतीक पालखडे (हिंगोली)शुश्रुत गुप्ता (नागपूर)गौरी पाटील (धुळे) अशा पाच विद्यार्थ्यांची नावे निवड यादीत आली असल्याचे प्रा.वर्मा यांनी सांगितले.हे पाचही तरुण आपआपल्या कार्यक्षेत्रात रुजू झाले असून आपले कर्तव्य बजावत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अपयशाने खचून न जाता जिद्द, आत्मविश्वास ठेवल्यास कुठल्याही परीक्षेत यश मिळते.स्पर्धा परीक्षेत अभ्यासाचे नियोजन महत्त्वाचे आहे.
प्रतीक पालखडे (तलाठी हिंगोली)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
लायब्ररीमध्ये मध्ये योग्य नियोजन करीत अभ्यास केला.याचे फळीत स्वरुपात पहिल्याच प्रयत्नात सैन्य दल आणि तलाठी पदी यश संपादन करीत. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद आहे.
 रीना अंजुम शेख नाझीम
तलाठी.
●●●●●●●●●●●●●

Related News