बोरगाव मंजू:शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, महाराष्ट्र इंग्लिश टीचर्स असोसिएशन अकोला आणि श्री शिवाजी हायस्कूल टाऊन ब्रांच अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजूची विद्यार्थिनी कु. प्रगती होळकर हिने ग्रामीण भागातील अ गटात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत तब्बल ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उद्घाटन समारंभ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. अरविंद मोहरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी श्री डी. बी. म्हैसणे, श्री मनोज देशमुख, श्री सुनील अवचार, श्री गणेश राऊत, सौ. वैशाली अवचार यांच्यासह परीक्षक प्रा. अमोल जती व प्रा. गोपाल दशमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कु. प्रगती होळकर हिला प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रगतीच्या यशाबद्दल गावात आणि शाळेत आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री मनोज आगरकर, उपमुख्याध्यापक श्री गजानन पोहनकर, पर्यवेक्षक श्री शंकर भदे, श्री गोपाल मालवे, श्री संदीप मनवर, वर्गशिक्षिका कु. किरण मेंगे व सौ. माधुरी दिपके यांना दिले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/dev-anandcha-guide-4-filmfare-awards/
