भारतीय नौदलात करिअरची सुवर्णसंधी

भारतीय नौदलात करिअरची सुवर्णसंधी

भारतीय नौदलात करिअरची सुवर्णसंधी; १,२०० हून अधिक पदांसाठी भरती सुरू

देशसेवा आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी भारतीय नौदलाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड या पदासाठी १,२०० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

इच्छुक उमेदवारांनी indiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. भरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात ९ ते १५ ऑगस्टच्या ‘रोजगार समाचार’मध्ये प्रकाशित झाली आहे.


रिक्त पदांचा तपशील

  • सहाय्यक – ४९ पदे

  • सिव्हिल वर्क्स – १७ पदे

  • इलेक्ट्रिकल – १७२ पदे

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो – ५० पदे

  • पॅटर्न मेकर / मोल्डर / फाउंड्रीमेन – ०९ पदे

  • हिल इंजिन – १२१ पदे

  • इन्स्ट्रुमेंट – ०९ पदे

  • मशीन – ५६ पदे

  • मेकॅनिकल सिस्टीम – ७९ पदे

  • मेकॅट्रॉनिक्स – २३ पदे

  • मेटल – २१७ पदे

  • मिलराइट – २८ पदे

  • रेफ्रिजरेशन अँड ए.सी. – १७ पदे

  • शिप बिल्डिंग – २२८ पदे

  • वेपन इलेक्ट्रॉनिक्स – ४९ पदे


शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त मंडळातून किमान दहावी उत्तीर्ण.

  • इंग्रजीचे ज्ञान आवश्यक.

  • संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे
    किंवा
    मेकॅनिक किंवा समकक्ष ट्रेडमध्ये आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये किमान २ वर्षांचा अनुभव असावा.


वयोमर्यादा

  • किमान वय: १८ वर्षे

  • कमाल वय: २५ वर्षे

  • आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार सवलत लागू.


वेतनमान

  • मासिक वेतन: ₹19,900 ते ₹63,200

  • अन्य भत्ते लागू.


निवड प्रक्रिया

१. लिखित परीक्षा – १०० गुणांचा पेपर

  • जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग – ३० प्रश्न, ३० गुण

  • जनरल अवेअरनेस – २० प्रश्न, २० गुण

  • क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३० प्रश्न, ३० गुण

  • इंग्रजी भाषा – २० प्रश्न, २० गुण
    २. दस्तऐवज पडताळणी
    ३. वैद्यकीय तपासणी


अर्ज करण्याची पद्धत

१. अधिकृत संकेतस्थळ onlineregistrationportal.in वर भेट द्या.
२. “Recruitment” विभागात जा.
३. “Civilian Tradesman Skilled 2025” लिंक निवडा.
४. प्रथम नोंदणी करा, नंतर लॉग इन करा.
५. आवश्यक माहिती भरा व कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी) अपलोड करा.
६. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
७. फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट प्रत ठेवा.