अकोट : तालुक्यातील सावरा गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाले.
१३ महार बटालियन मध्ये कार्यरत असलेले विजय सुरेश धांडे यांनी १७ वर्ष देशाच्या भारतीय सैन्य दलामध्ये सेवा दिली.
अवघ्या 17 वर्षाच्या देशसेवेनंतर भारतीय सैन्याने विजय सुरेश धांडे यांना सेवानिवृत्ती दिली.
सतरा वर्षाच्या अखंड सेवेनंतर विजय धांडे हे आपल्या मूळ गावी सावरा येथे पोहोचले.
४ ऑगस्ट रोजी जवान विजय धांडे व त्यांचा परिवार सावरा ह्या त्यांच्या मूळ गावी दाखल झाल्यानंतर त्यांची गावातील
नागरिकांच्या वतीने भव्य मिरवणूक पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ, फटाक्यांच्या
आतिशबाजी सहित मोठ्या हर्षऊल्लासामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.
संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्याला हार
अर्पण करून भव्य मिरवणूक गावामधून काढण्यात आली.
याप्रसंगी ठिकठिकाणी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सुनील भाऊ सपकाळ व नंदा सपकाळ यांनी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या झालेल्या सैनिकाचे जंगी स्वागत केले.
भव्य मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे हार अर्पण केले.
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/st-mahamandat-pad-bharati-dahavi-pass-te-pathvidhanna-nokri-praty/