दिल्ली: आशिया कप २०२५ मधील इतिहासिक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने प्रचंड विजय मिळवत वर्चस्व कायम राखले. परंतु या सामन्याच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या वर्तनामुळे प्रचंड चर्चेला चालना मिळाली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या अत्यंत तणावग्रस्त आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि अशा परिस्थितीत या दोन्ही देशांचे संघ एकमेकांशी सामने खेळण्यासाठी समोर आले.
सामन्यादरम्यान व टॉसदरम्यानही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या सलमान आघा सोबत हस्तांदोलन टाळलं. खेळ संपल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतविरुद्ध अपेक्षित नम्रता दर्शवली असता भारतीय खेळाडूंनी आपला ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करून पाकिस्तानी टीमला वाट पाहू दिलं नाही.
पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार यादवने स्पष्टपणे म्हटलं:
“काही गोष्टी या क्रीडा भावनेपेक्षा वरच्या असतात. आम्ही सरकार आणि बीसीसीआयच्या धोरणानुसार खेळलो आहोत. आम्ही इथे फक्त खेळ खेळण्यासाठी आलो होतो आणि आम्ही योग्य उत्तर दिलं आहे.”
सामन्यानंतर सूर्यकुमारने आपला विजय भारताच्या सशस्त्र दलांना समर्पित केल्याचं जाहीर केलं आणि पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांबरोबर एकात्मतेची भावना व्यक्त केली.
read also :https://ajinkyabharat.com/administration-citizen-motha-celebration/