भारतीय जोडप्याचा चौथ्या मजल्यावरुन उडी, पत्नीचा मृत्यू

नेपाळ हिंसाचारात भारतीय पर्यटकावर भीषण हादराः

नेपाळ – नेपाळमधील हिंसाचारात भारतीय पर्यटकांनाही मोठा फटका बसला. काठमांडूतील हयात रेजिडेन्सी हॉटेलमध्ये आग लागल्याने रामवीर सिंह गोला आणि त्यांच्या 55 वर्षीय पत्नी राजेश गोला यांनी जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावर उडी मारली. बचाव पथकाच्या प्रयत्नामुळे काही लोकांना वाचता आले, पण राजेश गोला गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हा प्रकार 7 सप्टेंबर रोजी घडला. रामवीर सिंह आणि त्यांची पत्नी पशुपतिनाथ मंदिर दर्शनासाठी गेलेत . रात्री 11.30 वाजता हिंसक जमावाने हॉटेलमध्ये आग लावली. उडी मारल्यानंतर दोघांमध्ये ताटातूट झाली; रामवीर सिंह जखमी अवस्थेत दोन दिवसांनी मदत शिबिरात सापडले.

घटनास्थळी उपचार सुविधा पुरेशा नसल्याने मृतदेह इंडो-नेपाल बॉर्डर सोनौलीमार्गे गाजियाबादमध्ये नातेवाईकांकडे आणण्यात आले. ही घटना नेपाळमधील हिंसाचाराची भयानक दृष्ये दर्शवते, ज्यामुळे पर्यटकांसाठी जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/obc-nete-laxman-hakechi-rajakaranyanwar-agapakhad/