40 प्रवाशांना नेपाळला घेऊन जाणारी भारतीय बस नदीत कोसळली

14 जणांचा

14 जणांचा मृत्यू

नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.

40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या

Related News

तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून

काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा

मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही.

तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, यूपी एफटी

7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात

14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत.

खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून

झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची

अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस

यांनी म्हटले. तसेच, जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार

असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.

प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते.

Read also: https://ajinkyabharat.com/today-is-the-first-national-interval-day/

Related News