भारतीय लष्कराला मिळाला नवा एडजुटेंट जनरल

 लेफ्टनंट जनरल

 लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक यांनी भारतीय लष्कराच्या ॲडज्युटंट जनरल चा

पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी

व्हीपीएस कौशिक त्रिशक्ती कॉर्प्समध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी)

Related News

म्हणून कार्यरत होते. ‘लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक यांनी आज

भारतीय लष्कराच्या ॲडज्युटंट जनरलचा पदभार स्वीकारला आहे .

ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते त्रिशक्ती कॉर्प्सचे

जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम करत होते,’

असे अतिरिक्त महासंचालनालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे.

तथापी, लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक

आणि कर्नल कमांडंट म्हणूनही पदभार स्वीकारला आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये

सार्वजनिक माहितीच्या अतिरिक्त महासंचालनालयाने सांगितले की,

‘लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक

आणि कर्नल कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक NWM येथे शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली.

तसेच त्याच उत्साहाने देशाची सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्व श्रेणींना प्रेरित केले.’

ॲडज्युटंट जनरल हे भारतीय लष्करातील वरिष्ठ पद आहे.

या पदाचा अधिकारी लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करतो.

त्याच्याकडे अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात.

सैन्याच्या नियोजनासाठी ॲडज्युटंट जनरल जबाबदार असतो.

कोणत्याही विशेष कार्यासाठी एक टीम तयार करणे किंवा एकापेक्षा जास्त बटालियनमधील

सैनिकांची टीम तयार करण्याची जबाबदारी ॲडज्युटंट जनरलची असते.

सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवणे,

सैनिकांमध्ये शिस्त राखण्यासाठी धोरणे बनवणे ही देखील ॲडज्युटंट जनरलची जबाबदारी असते.

Read also: https://ajinkyabharat.com/lower-the-age-limit-for-contesting-elections-raghav-chadhas-demand/

Related News