India Test Captain 2025 : शुभमन गिलकडे कसोटी संघाची धुरा, गंभीरसोबत ५ तासांची बैठक निर्णायक ठरली

India Test Captain 2025 : शुभमन गिलकडे कसोटी संघाची धुरा, गंभीरसोबत ५ तासांची बैठक निर्णायक ठरली

दिल्ली | प्रतिनिधी

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला होता.

मात्र आता भारतातील नवीन कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

Related News

गौतम गंभीर आणि गिल यांच्यात अलीकडे दिल्लीमध्ये तब्बल ५ तास बैठक झाली होती,

आणि त्यानंतर गंभीरने गिलच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

 कसोटी नेतृत्वासाठी शर्यत – गिल आघाडीवर

गेल्या काही दिवसांपासून कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी ऋषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची

नावे चर्चेत होती. मात्र, गिलचा सातत्यपूर्ण फॉर्म आणि नेतृत्वगुणांमुळे त्याला पुढे आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुभमन गिल सध्या भारताच्या ODI संघाचा उपकर्णधार देखील आहे आणि त्याच्याकडे नेतृत्वाची प्राथमिक जबाबदारी आधीपासून आहे.

 बुमराहचे नाव मागे का पडले?

जसप्रीत बुमराह हा कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार असला, तरी त्याच्या सातत्याने होणाऱ्या

दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे तो सर्व ५ कसोटी सामने खेळू शकेल याची शक्यता कमी आहे.

त्यामुळेच त्याच्याऐवजी नियमित खेळणाऱ्या आणि फिट राहणाऱ्या खेळाडूला कर्णधार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 इंग्लंड दौऱ्यापासून नव्या युगाची सुरुवात

भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

हा दौरा WTC 2025-27 सायकलचा पहिला भाग असेल. त्यामुळे गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा नव्या युगाकडे प्रवास सुरू होणार आहे.

 बीसीसीआयमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

PTI च्या अहवालानुसार, काही बीसीसीआय अधिकाऱ्यांना गिलचे नाव कर्णधार म्हणून मंजूर नसले तरी,

मुख्य कोच गौतम गंभीरचा गिलवर असलेला विश्वास निर्णायक ठरला.

गंभीरच्या मते, गिल आगामी दशकासाठी भारताला मजबूत नेतृत्व देऊ शकतो.

23 मे रोजी अधिकृत घोषणा शक्य

संभाव्य कर्णधार आणि संघ निवडीबाबत अधिकृत घोषणा 23 मे रोजी होण्याची शक्यता असून,

त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा होणार आहे.

 गिलसाठी हा एक मोठा टप्पा ठरणार आहे,

जिथून भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/through-the-panic/

Related News