भारत-युरोप व्यापारात नवा महाकाय डीलचा मार्ग

मोदींच्या त्या फोनने ट्रम्प यांचा मोठा गेम

उर्सुला वॉन डेर लेयेनच्या घोषणा

 अमेरिकेच्या वाढत्या टॅरिफमुळे आता संपूर्ण जग व्यापारी धोरणांमध्ये बदल करण्यास प्रवृत्त होत आहे. युरोपियन संघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी जर्मनीतील एका उद्योजक परिषदेत स्पष्ट केले की, अमेरिका या देशावर अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि वाढत्या टॅरिफच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी युरोपियन संघ लवकरच भारतासह इतर अनेक देशांसोबत मोठे व्यापारी करार करणार आहे.उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सांगितले की, या वर्षी भारतासोबत मोठा मुक्त व्यापार करार (FTA) करण्याची आमची इच्छा आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बुधवारी फोनवर चर्चा झाली असून, भारतकडून देखील याबाबत आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करण्यात आली आहे.यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे आता जगभरातील प्रमुख देशांनी वैकल्पिक व्यापार मार्गांचा शोध सुरू केला आहे, आणि भारत या दिशेनं महत्त्वाचा भाग म्हणून उभा राहिला आहे. भारत आणि युरोपियन संघामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरु आहे. हा करार पार पडल्यास वस्तू, सेवा व गुंतवणूक क्षेत्रामध्ये दोन्हीकडे सामंजस्य आणखी वाढेल.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युरोपसाठी भारत ही वेगाने वाढणारी बाजारपेठ असून मुक्त व्यापार करारामुळे केवळ निर्यातदार व गुंतवणूकदारांना फायदा होणार नाही, तर भारताला युरोपियन बाजारपेठ सहज उपलब्ध होईल.उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी यासोबतच सांगितले की, युरोपियन संघाची दक्षिण आफ्रिका, मलेशिया व युएईसोबत देखील चर्चा सुरु आहे. त्यांचा उद्देश सप्लाय चेन सुरळीत ठेवणे आणि एका देशावर अवलंबित्व कमी करणे हा आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/niye-vadala-aggressive-policeman-request/