भारत-अमेरिका टॅरिफ युद्धात मक्याचा वाद

मक्याच्या टॅरिफ वादात नवा ट्विस्ट;

भारत आणि अमेरिकेमधील टॅरिफ संघर्षात आता मक्याचा वाद उफाळून आला आहे. अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी जोरदार आरोप केला की, “भारताची लोकसंख्या 140 कोटी असूनही, भारत आमच्याकडून एक गोणी मका सुद्धा विकत घेत नाही.” या वक्तव्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – भारत अमेरिकेकडून मका का खरेदी करत नाही?

 कारणं काय आहेत?
भारत जगातील 6 वा मोठा मका उत्पादक देश असून, यूपी, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, तामिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणात मक्याची शेती होते. वर्ष 2023 मध्ये भारताने सुमारे 5 हजार टन मका आयात केला, तर 2024 मध्ये हा आकडा 10 लाख टन पर्यंत वाढला आहे. मुख्यत्वे म्यानमार, यूक्रेन, थायलंड, अर्जेंटीना यांसारख्या देशांकडून टॅरिफ फ्री मक्याची खरेदी केली जाते.

🇺🇸 अमेरिकेकडून मका का नाही?
मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील मक्याचा 90% भाग जेनेटिकली मोडिफाइड (GMO) असतो, ज्याचा भारतात उपयोग करण्यावर कठोर बंदी आहे. शिवाय, अमेरिकेकडून मका आयात केल्यास 50 टक्के टॅरिफ लागू होते, ज्यामुळे तो महागड्या दरात भारतात उपलब्ध होतो. त्याऐवजी भारताच्या गरजेला अनुरूप जवळच्या देशांकडून कमी खर्चात, GMO नसलेला मका आयात केला जातो.

 मागणी वाढली का?
इथेनॉल निर्मितीसाठी मका वापर वाढल्यामुळे भारताची आयातीची गरज अधिक वाढली आहे. 2047 पर्यंत मक्याचे उत्पादन 8.6 कोटी टन करण्याचे लक्ष्य आहे. मात्र अद्याप इथेनॉल निर्मितीसाठी पुरेशा प्रमाणात उत्पादन नाही, त्यामुळे आयात आवश्यक आहे.

🇮🇳 धोरणात्मक निर्णय
भारत सरकार शेतकऱ्यांचे हित जपण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावानंतर सुद्धा मक्याची खरेदी टाळली जात आहे. या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक व कृषी स्वावलंबनाचा संदेश जागतिक पातळीवर दिला जात आहे.

 अमेरिका – भारत टॅरिफ युद्ध आता मक्यापर्यंत पोहोचल्याने पुढील दिवसात या वादाची अधिक तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

read also :https://ajinkyabharat.com/kalyanamadhil-dhakkadayak-episode-ughdakis/