एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा

शिवर येथील

शिवर येथील एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

या समारोहाची सुरवात प्रभात फेरीने करण्यात आली. महापुरुषांचा वेशभूषातील

विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरी मध्ये नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Related News

ध्वजारोहन समारंभाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. लक्ष्मीबाई पिंजरकर

शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आशाताई पिंजरकर

तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्रीकांत पिंजरकर,

संस्थेचे सदस्य ऍड. नितीन धूत, शाळेचे पालक रत्नाबाई इंगोले, सुनीता दोडे,

शिक्षक पालक संघांचे सदस्य शरद देशमुख, आनंद ढोरे, प्रभाकर गवई हे होते.

यावेळी अनेक विध्यार्थ्यांनी महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करून

स्मृतीस उजाळा देतांना आपले मनोगत व्यक्त केलेत.

तर विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह देशभक्तीपर गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला.

“भारतीय स्वातंत्र्याचा समग्र इतिहास आपल्याला हुतातम्यांनी

आपल्यासाठी केलेल्या बलिदानची गाथा आहे. याची उजळणी आपल्यासमोर

तयार होत असलेल्या उद्याचा सक्षम नागरिकांसमोर वारंवार करून

आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्व सतत विषद केले पाहिजे”

असे मत यावेळी बोलताना श्रीकांत पिंजरकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचा शिक्षिका सपना बेलखेडे यांनी केले

तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्याक नरेंद्र पाटोळे यांनी आणि आभार

शुभांगी क्षीरसागर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य प्रशांत पिंजरकर,

सारिका भागवत, माया खंडारे, सरिता बढे, नीलिमा देशमुख, गायत्री अवचार,

अपेक्षा भोलवनकर, निखिलेश ढोरे, प्राची खारोडे, आरती अळसपुरे,

काजल भागवत, माधुरी चंद्रे यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाला माजी विध्यार्थी,

शाळेचे पालक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/death-of-two-minor-youths-in-budun-at-the-foot-of-kamal-ganga-river/

Related News