मुंबई : आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने प्रचंड विजय मिळवला. सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय संघासाठी उत्साहवर्धक ठरला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवले, मात्र भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीने हे आव्हान आरामात पार केले.अभिषेक शर्माने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या, तर शुभमन गिलने 47 धावांचं योगदान दिलं. दोघांनी मिळून 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. नंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाची गोडी कायम राखली.पाकिस्तानकडून सलामीला आलेले फखर जमान आणि साहिबजादा फरहान यांनी सुरुवातीला आक्रमक खेळ दाखवला, पण हार्दिक पांड्याने फखर जमानला 9 चेंडूत 15 धावा करून बाद केलं. त्यानंतर साहिबजादा फरहान आणि सईम अयूब यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली, ज्याने पाकिस्तानचा डाव सावरला.अभिषेक शर्माच्या धडाकेबाज आक्रमक खेळीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धक्का दिला आणि भारताच्या विजयाला गती दिली. टीम इंडियाचा हा विजय संपूर्ण संघासाठी उत्साहवर्धक ठरला असून, भारताचा आक्रमक अंदाज सर्वांना भावला. टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत विजयी सुरुवात केली आहे. भारताने साखळी फेरीनंतर सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत धमाकेदार विजय मिळवला आहे. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीन केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं.
read also : https://ajinkyabharat.com/i nd-vs-pak-abhishek-sharma-power-vasuli/