आशिया कप 2025 मधील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना 21 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा संघ सामन्यात जबरदस्त रूपात दिसत असल्याने पाकिस्तान संघ आधीच मानसिक दबावाखाली आहे.यापूर्वीच्या आशिया कपच्या साखळी फेरीत भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केले होते. या विजयानंतरही भारतीय संघाने हँडशेक न करता पाकिस्तानला ठाम संदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा आमनेसामने येणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ घाबरलेल्या स्थितीत दिसत आहे.पाकिस्तानी संघाने पत्रकार परिषद रद्द केली असून, सामना खेळण्यापूर्वी मोटिवेशनल स्पीकर डॉ. राहील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची मानसिक तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संघाच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघाच्या विचित्र वर्तनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना लाज वाटत असल्याचे दिसत आहे. युएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या हटवण्याची मागणी केली होती, पण हा निर्णय मान्य झाला नाही. नंतर सामना न खेळण्याचा निर्णय घेऊन एक तास उशिराने सामना सुरू झाला होता.आता सुपर 4 फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहेत, आणि पाकिस्तान संघाचे नवीन नाटकीपण लक्षवेधक ठरणार आहे.
IND vs PAK : भारताविरुद्ध सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा नाटकीपणा

20
Sep