“IND vs AUS Semi Final Live: दुबईत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये महामुकाबला!”

"IND vs AUS Semi Final Live: दुबईत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये महामुकाबला!"

India vs Australia Semi Final Champions Trophy Live Score in Marathi : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत टीम इंडिया

विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.

दोघांपैकी अंतिम फेरीत कोण पोहचणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

Related News

  • 4 Mar 2025 12:30 PM (IST)

    IND vs AUS SF Live Updates : टीम इंडिया दुबईत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजिंक्य

    टीम इंडियाने आतापर्यंत दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही.

    टीम इंडियाने दुबईत याआधी 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

    तर 1 मॅच टाय झालीय.

  • IND vs AUS SF Live Updates : दुबईत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने

    आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.

    या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

    सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

  • हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
    टीम इंडियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला.
    तर 2 सामने पावसामुळे रद्द झाल्याने 1-1 असे एकूण 2 गुण मिळाले आणि कांगारु उपांत्य फेरीत पोहचले.
    आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.
    या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Related News