गव्हाच्या हमीभावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांची वाढ

मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची

बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे

Related News

निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात

वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ

बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत

पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास

आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन

डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र

सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत

अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत

शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या

हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या

हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300

रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत

6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार

आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या

शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा

राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.

1. गहू – 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल

हमीभाव असणार

2. मोहरीच्या किंमतीत – 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950

रूपये क्विंटल हमीभाव असणार

3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980

रूपये क्विंटल हमीभाव असणार

4. हरभऱ्याची किंमतीत – 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार

650 रूपये क्विंटल हमीभाव असणार

5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार

700 रूपये क्विंटल हमीभाव असणार

6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार

940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/knowing-mahadev-the-great-alliance-will-fight-outside-with-its-own-strength/

Related News