गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं.
Related News
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
अकोट नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक अभय योजना;
नवीन संचमान्यता धोरणामुळे मोफत शिक्षण व्यवस्था धोक्यात;
‘सगळं हवेतच उडवलं जाईल’; ट्रम्प यांची घोषणा –
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;
धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;
अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:
मात्र, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी
काही मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’
या निवासस्थानासमोर आंदोलन केलं.
यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
तसेच यावेळी त्यांनी सूचक विधानही केलं.
दोन तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार, असं मनोज जरांगे यांनी
माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच.
फक्त सत्ताधारी पक्षाला नाही तर विरोधकांना देखील आम्ही सांगतो.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा.
सत्ताधारी आणि विरोधकांनी ७० वर्ष आमचे मते घेतलेले आहेत.
त्यामुळे भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जर हे भूमिका स्पष्ट करत नसतील
तर यावेळी मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काही आंदोलकांनी आंदोलन केलं.
यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आता आम्ही टेन्शन घेत नाहीत.
कारण लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण १२ ते १३ संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या
सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूने न बोलता फक्त काहीही बोलायचं असं त्यांनी सांगितलं.
Read also: https://ajinkyabharat.com/raju-shetty-will-field-288-candidates-for-assembly/