महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज
काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी
काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा
करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला,
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,
पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत.
हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा
घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत
चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी
यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी
नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल
झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात
देखील दाखल झाले आहेत. आज विधानसभा निवडणूक जाहीर
होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील
काही जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या
बैठकीत यावर चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार
रणनितीबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-toll-waiver-announcement-by-shinde-government/