शेलुबाजार – तालुक्यातील ग्रामीण भागात अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या संख्येने घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जन स्थळी अस्वच्छता आणि अंधार असल्यामुळे भक्तांना अडचणींना सामोरे जावे लागते.सामाजिक कार्यकर्ते सचिन डोफेकर यांनी याबाबत ग्रामपंचायत व नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी केली आहे. विसर्जन ठिकाणी स्वच्छता करून ती जागा स्वच्छ व सुरक्षित करावी, तसेच रात्री विसर्जनावेळी उजेडासाठी लाईटची योग्य व्यवस्था करावी, असे ते म्हणाले.डोफेकर यांनी पुढे सांगितले की, अनेकदा विहिरी, धरण, तलाव किंवा नदीकाठी विसर्जन केले जाते. या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची योग्य सोय नसल्याने भक्तांना त्रास होतो. त्यामुळे रस्त्यांची देखील दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.गणेश भक्तांना सुरळीतपणे व कोणत्याही अडथळ्याशिवाय विसर्जन करता यावे यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/fidicb-photo-pahoon-trump-yancha-jafat/