अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर पकडले

अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर पकडले

पातुर (प्रतिनिधी)

अवैध गौण खनिज म्हणजेच मुरूमची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर नायब तहसीलदारांच्या तत्पर कारवाईत पकडण्यात आले.

ही कारवाई दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंबासी गावाजवळ करण्यात आली.

Related News

नायब तहसीलदार बळीराम चव्हाण हे दौऱ्यावरून परतत असताना त्यांना रस्त्यावर मुरूमने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली आढळली.

त्यांनी तातडीने कारवाई करताच, ट्रॅक्टर चालकांनी शासकीय अधिकाऱ्यांना पाहताच वाहने सोडून पोबारा केला.

या घटनेत एक ट्रॅक्टर (क्र. MH 30 AB 5787) आणि दुसरे लाल रंगाचे ट्रॅक्टर, ज्यावर नंबर नव्हता,

असे दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जप्त करण्यात आले. यामध्ये चालक मुजाहिद खान युसुफ खान,

आसिफ खान, शेख फैजान, शेख जब्बार आदींचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.

जप्त केलेली वाहने पातुर पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली असून,

तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या आदेशापर्यंत ती पोलिस कोठडीत राहणार आहेत.

या कारवाईमुळे अवैध खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्याच्या

दृष्टीने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

Related News