रिसोड: रिसोड पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून 59,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता रिसोड–वाशिम मार्गावर, ग्राम सवडजवळील कबीर कुटी येथे करण्यात आली.पोलीस सूत्रांनुसार, रिसोड पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली होती की, एक इसम दुचाकीवरून अवैधरित्या देशी दारू वाहतूक करत आहे. यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, प्रशांत राजगुरू, रवी आढागळे, परमेश्वर भोने यांनी स्थानिक पोलिसांसह आरोपीला थांबवले. आरोपीने स्वतःचे नाव सोनू उर्फ दीपक धम्मपाल बोरकर, वय 19 वर्षे, रहिवासी समता नगर, रिसोड असे सांगितले.त्याच्या दुचाकीची तपासणी केल्यावर पुठ्ठ्याच्या बॉक्समधून 240 नग देशी दारू, भिंगरी आणि संत्रा मिळाले. या दारूची बाजारात किंमत 19,200 रुपये असून, दुचाकीची किंमत 40,000 रुपये आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 59,200 रुपये ठरली.सदर आरोपी व जप्त मालासह रिसोड पोलिस स्टेशनला आणून कारवाई करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुज तारे (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक लता फड (म.पो.से.), सहा. पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/capus-production-cooks/
