राजू शेट्टींची सरकारवर टीका – “महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली”
मूर्तिजापूर (जि. अकोला): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी साहित्य
संमेलन आणि दहावे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
या दोन दिवसीय कार्यक्रमात शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल मंथन होणार आहे.
या संमेलनाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की, महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
“महायुतीचे नेते ग्रामीण भागात फिरू शकणार नाहीत” – शेट्टी
राजू शेट्टी यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार गेली अनेक वर्षे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची पुरेशी माहिती आहे.
तरीही त्यांनी असे आश्वासन का दिले?” त्यांनी महायुतीवर टीका करत म्हटले की,
“शेतकऱ्यांना गंडवून फक्त मतं मिळवण्याचा हा डाव आहे.
त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही ग्रामीण भागात फिरू देणार नाही.”
अजित पवारांवर ‘मोहम्मद तुघलक’ची उपमा
शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना “मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला,
हा इतिहास त्यांनी बघावा” असे म्हणत टीका केली.
तसेच, राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, मात्र काही अंशी शेतकरी स्वतःही
सरकारच्या धोरणांना जबाबदार आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.