गणेश विसर्जनासाठी ईदची शोभायात्रा दोन दिवस उशिरा

रिसोडच्या

रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय

येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक

सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ

Related News

नये म्हणून रिसोडच्या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी

१६ सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी सणाची शोभायात्रा

१८ सप्टेंबरला काढण्याचा आदर्श निर्णय त्यांनी ९ सप्टेंबरला घेतला आहे.

रिसोड पोलिस स्टेशनमध्ये ९ सप्टेंबर रोजी ठाणेदार भुषण गावंडे यांच्या

अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाचे मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा

बोलाण्यात आली होती. या सभेमध्ये आगामी गणेश विसर्जन सोहळा आणि

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव. या विषयावर

चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वानुमते १६ सप्टेंबरला

साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईद- ए-मिलादुन्नबीची शोभायात्रा १६ सप्टेंबरऐवजी १८

सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अनेक वेळा हिंदू मुस्लिमांचे

सण एकत्रित आल्याने रिसोड येथील मुस्लिम बांधवांनी असे आदर्श निर्णय घेऊन

सामाजिक एकोप्याची प्रचिती दिली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/contradiction-of-rahul-gandhis-statement/

Related News