हैदराबाद गॅझेटवर राज्यात तणाव: अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्रामांचा मोठा विरोध
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा हैदराबाद गॅझेटचा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून या गॅझेटला विरोध करत मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. मात्र या जीआरवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.
ओबीसी आणि मराठा समाजात तणाव
ओबीसी समाजाकडून या जीआरवर जोरदार विरोध नोंदवण्यात आला आहे. त्यांचा दावा आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यामुळे राज्यात ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
आदिवासी आणि बंजारा समाजात भांडण
हैदराबाद गॅझेटवरून आदिवासी समाज आणि बंजारा समाज देखील आमने-सामने आले आहेत. बंजारा समाजाने आपल्या समावेशासाठी एसटी प्रवर्गात ठेवण्याची मागणी सुरू केली आहे. मात्र आदिवासी समाजाने या मागणीला विरोध दर्शवला आहे, ज्यामुळे राज्यात गॅझेटवरून वातावरण अधिक तापले आहे.
अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्रामांचे वक्तव्य
धर्मराव बाबा आत्राम यांनी या संदर्भात म्हटले की, “आदिवासी हा शेड्यूल्ड ट्राईब आहे, बाकीचे लोक आणि बंजारा समाज यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, ते चुकीचे आहे. एसटी आणि व्हीजेएनटी हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यांना आदिवासीमध्ये घेण्याचा प्रश्नच नाही. हैदराबाद गॅझेट महाराष्ट्रात लागू होत नाही, त्यांनी हैदराबादला जावे.”
आत्राम पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात चंद्रपूर गॅझेट आहे, आमच्या जवळ भरपूर संख्या आहे, आदिवासींसाठी 25 जागा येऊ शकतात. आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू. शेड्यूल्ड ट्राईब आणि नोमॅडिक ट्राईब हे वेगवेगळे आहेत. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याचा प्रश्नच नाही.”
read also : https://ajinkyabharat.com/smartphone-toblet-ani-audio-productswar-bang-discount/
