हैदराबाद गॅझेट निर्णयामुळे अनेक संकटे उभी राहू शकतात

हैदराबाद

मुंबई – मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयावर आता विरोधाचा शोर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.भुजबळ म्हणाले, “एकदा हैदराबाद गॅझेटप्रमाणे निर्णय घेण्यास सुरुवात झाली की अनेक प्रश्न निर्माण होतात. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यामुळे ओबीसीत त्यांचा समावेश करणे न्यायालयीनदृष्ट्या अडचणीचे आहे.”मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे तीन-चार दिवस दक्षिण मुंबई बंद पडली होती. यामुळे सामाजिक व राजकीय तणाव निर्माण झाला असून आता वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरही मत व्यक्त करत, “ओबीसी समाज आणि भटक्या विमुक्तांचे नुकसान होत आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण किंवा ईडब्ल्यूएस आरक्षण मिळाले आहे, तरीही या आरक्षणाचा फायदा त्यांना हवे का? हा प्रश्न न्यायालयानेही उपस्थित केला आहे,” असे सांगितले.त्यांनी बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी आणि त्यावर सुरू असलेल्या वादावर थेट भाष्य करणे टाळले, पण सावधगिरीने निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

read also : https://ajinkyabharat.com/shetkari-debt-waiver-molestation/