तत्काळ पंचनाम्याचे आदेश
कारंजा (लाड) कारंजा तालुक्यात सह हुमणी अळीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे पोहा परिसरातील शेतकऱ्यांना
मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आज मा. आमदार सई ताई डहाके यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.
व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पिके सडली असून उगम थांबलेला आहे, अनेक ठिकाणी शेती नष्ट होण्याच्या स्थितीत आहे.
विशेषतः सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
शेतकऱ्यांनी शासनाकडे त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
यावर मा. आमदार सई ताई डहाके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले,
“संबंधित यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांचे दु:ख हेच आमचे दु:ख असून, योग्य ती मदत मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करू.”
या दौऱ्यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीवजी काळे, सुरेशभाऊ दहातोंडे, रवींद्रजी घुले,
सरपंच शीतल मसने, डॉ. मोहनराव धाडवे, छगनराव बहाडे, नायब तहसीलदार हरणे साहेब,
कृषी अधिकारी जैताळे साहेब, ढोकणे साहेब, तसेच तलाठी, मंडळ अधिकारी,
ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यासह अनेक शेतकरी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/bankechaya-debtam/