पावसाचा हाहाकार; नांदेडमधील गावांना पुराचा वेढा

पावसाचा

पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली

दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग

कालपासून पाण्याखाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेक

Related News

गावं पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि

नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यातील

हदगावमधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे.

गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरं

सुद्धा वाहून गेली आहेत. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

30 शेतकरी शेतामध्ये, घरावर अडकून पडले आहेत. एसडीआरएफची टीम

बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.

नांदेडमध्ये पाण्याचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील मुख्य

स्मशान भूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नांदेड जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील

आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड शहराशी वसमत आणि इतर

50 ते 60 गावांचा संपर्क तुटला आहे. तर आताही नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा

जोर कायम आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/namibia-severe-drought/

Related News