हॉटेल व्यवसायिकावर हल्ला; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह

हॉटेल व्यवसायिकावर हल्ला; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह

अकोला : शहरातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला असून

एका हॉटेल व्यवसायिकावर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम जाधव हे आपल्या हॉटेलमध्ये दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना,

दोन तरुण तोंडावर दुपट्टा बांधून मुख्य दरवाजातून आत घुसले.

या दोघांनी अचानक लाकडी दांड्याने शुभम यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.

घटनेनंतर शुभम जाधव यांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मात्र, पोलिस योग्य तपास करीत नसल्याचा आरोप पीडित व्यवसायिकाने केला आहे.

दुसरीकडे, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

हा प्रकार उघड झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/maratha-reservation-vasathi-29-augustla-mumbai/