महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्राच्या जोरावर 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे यशस्वीरित्या वाटचाल करत असून,
उद्योजकांना सर्व आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, पाणी, वीज, रस्ते, कनेक्टिव्हिटी,
पर्यावरण व वन परवानग्या, जमीन वाटप व मजूर कायद्यांच े पालन या सर्व बाबतीत उद्योगांना मदत झाली पाहिजे.
सर्व परवानग्या ‘मैत्री पोर्टल’ वर एकत्रितपण े ऑनलाईन देण्यात याव्यात
आण ि उद्योजकांना निनावी तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.