पांढरे केस काळे करण्यासाठी…..घरगुती उपाय

वाढत्या वयात केस पांढरे होणे ही सामान्य समस्या आहे. केस पांढरे झाल्यानंतर कोणतीही हेअर स्टाईल केली तरीसुद्धा केस चांगले दिसत नाहीत. तसेच हल्ली अनेकांचे तरुण वयातच केस पांढरे होण्यास सुरुवात झाली आहे. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा काळे करण्यासाठी मेहंदी, डाय किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. पण हेअर कलर केल्यानंतर काहीकाळ केसांवर रंग टिकून राहतो आणि पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. सर्वच महिला आणि पुरुषांना आपले केस काळे असावे असे नेहमीच वाटत असत. पण केसांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आणि आनुवंशिकतेमुळे केस पांढरे होऊन जातात. केस काळे करण्यासाठी डाय, मेहंदी किंवा रंग वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा, जेणेकरून केस नैसर्गिकरित्या काळे होतील. आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पांढरे केस काळे दिसू लागतील.

कढीपत्त्याची पाने:

केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याची पाने अतिशय गुणकारी आहे. कढीपत्याच्या पानांचाहा हेअर मास्क केसांना लावल्यास पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. पांढऱ्या केसांच्या समस्येपासून आराम मिळेल. कढीपत्त्याची पाने केसांना वापरताना वाटीभर तेलात कढीपत्त्याची पाने गरम करून घ्या. त्यानंतर तेल थंड करून गाळून बंद डब्यात भरून ठेवा. या तेलाचा वापर आठवड्यातून एकदा केसांच्या वाढीसाठी केल्यास केस मजबूत आणि काळेभोर होतील.पांढऱ्या रंगाचा केसही दिसणार नाही.

लिंबाचा रस:

विटामिन सी युक्त लिंबाचा रस त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. केस काळे करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसात भरपूर विटामिन आणि खनिजे आढळून येतात. शिवाय यात असलेले प्रभावी घटक केसांच्या वाढीसाठी मदत करतात. लिंबाच्या रसाचा वापर थेट केसांवर करू नये. यासाठी लिंबाच्या रसात दही मिक्स करून लावावे. तयार केलेली पेस्ट केसांना लावून ३० मिनिटं ठेवून केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे केस मऊ आणि मजबूत होतील.

आवळ्याचा वापर:

मागील अनेक वर्षांपासून आवळ्याचा वापर केसांच्या घनदाट वाढीसाठी केला जात आहे. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी अ‍ॅंटी-ऑक्सिडेट्स आणि फायबर्स केसांची चमक वाढवण्याची मदत करतात. आवळ्याच्या रसाचे किंवा आवळ्याचे नियमित सेवन केल्यास केस पांढरे दिसणार नाहीत. केसांची चमक वाढेल.

 

काळा चहा:

काळ्या चहामध्ये मेहंदी भिजवून लावल्यास केस थंड होतात. तसेच टाळूवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. केसांचा काळेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी काळ्या चहाचे सेवनसोबत मेहंदीमध्ये काळा चहा मिक्स करून लावावा. काळा चहा तुम्ही नुसताच केसांना लावू शकता. यामुळे केस तुटणार नाहीत.