गृहराज्यमंत्री दिव्य, शांततेत अत्याचार झाला?, योगेश कदम यांच्यावर संजय राऊतांची जोरदार टीका

गृहराज्यमंत्री दिव्य, शांततेत अत्याचार झाला?, योगेश कदम यांच्यावर संजय राऊतांची जोरदार टीका

 पुण्यात स्वारगेट येथे 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये

अत्याचार झाल्याचे प्रकरण घडले आहे.

संजय राऊत यांनी याप्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम

यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राऊत यांनी यावेळी काही गंभीर आरोप देखील केली आहेत.

मुंबई : पुण्यातील स्वारगेट आगारात एका 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात

आल्याची धक्कादायक घटना घडलीये. काही तासांनी अखेर पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले.

काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले.

Related News

आता त्यावरून योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका करताना संजय राऊत हे दिसले आहेत. संजय राऊत यांनी म्हटले की,

पुण्यातील सर्व गुंड भारतीय जनता पक्षाच्या आणि अजित पवारांच्या पक्षाच्या प्रचारात सक्रिय होते.

राऊत म्हणाले, गृहराज्यमंत्री दिव्य आहेत. आरोपीला पकडून सरकारने उपकार केले आहेत का?.

राजकिय वरदहस्त असलेले अनेक गुन्हेगार आहेत. शांततेत अत्याचार असे गृहराज्यमंत्र्यांनी विधान केले,

गृहराज्यमंत्री दिव्य आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत दिसले. राऊत म्हणाले की, लेखक,

साहित्यिक, कवी या सर्व पदव्या त्यांना हव्या आहेत त्या एकनाथ शिंदे हे विकत घेऊ शकतात. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार,

साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळू शकतो.

हे एकनाथ शिंदे कंपनी जे बोलत आहेत, त्यांचा मराठी साहित्य, इतिहास यांच्याशी त्यांचा काहीच संबंध नाहीये.

प्रचंड पैसा आहे, अशाप्रकारचा पैसा आैरंगजेबाकडे पण होता. अमित शहा हे एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा देऊ शकतात.

शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सूरतवर हल्ला करावा लागला.

कारण सूरजमध्ये गुजरातमध्ये इतका पैसा होता की, ते मोगलांना पैसा देत होते, या देशाच्या विरोधामध्ये.

म्हणून छत्रपतींना सूरज लूटावी लागली आणि त्याच सूरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांची

लोक जाऊन थांबली होती. फार मोठे साहित्य त्यावेळी त्यांच्याकडे होते. पुण्याच्या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले,

कोणतीही पार्टी आपल्या कार्यकर्त्याला म्हणत नाही की, जाऊन अत्याचार कर. ती एक विकृती असते.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीचा फोटो आमदारासोबत व्हायरल होत असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली.

याबद्दलच बोलताना राऊत दिसले.

MORE UPDATES HERE

https://ajinkyabharat.com/me-shahabaz-boltoy-ministry-of-ministry-office-udwoon-deu-pakistani-numbern-threat-polis-alert/

 

Related News