अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्सच्या घर वापसीबद्दल अखेर आनंदाची बातमी

अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्सच्या घर वापसीबद्दल अखेर आनंदाची बातमी

Sunita Williams : मागच्या आठ महिन्यांपासून अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि

सुनीता विलियम्स यांच्या घरवापसी बद्दल एक आनंदाची बातमी आहे.

सुनीता विलियम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या.

नासाच्या दोन अंतराळवीरांच ठरलेल्या वेळेआधी पृथ्वीवर आगमन होऊ शकतं.

अंतराळ संस्थेनुसार, स्पेसएक्स आगामी अंतराळ मोहिमांसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे.

अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावं, यासाठी हा बदल केला जाणार आहे.

Related News

या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी दोन आठवड्याने कमी होणार आहे.

मागच्या आठवड्यात बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आठ महिने पूर्ण झालेत.

सुनीता विलियम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या.

नासाच्या वाणिज्यिक चालक दल प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी सांगितलं की,

मानवी अंतराळ मोहिम अनेक आव्हानांनी भरलेली असते’ विल्मोर आणि सुनीता विलियम्स दोघेही उड्डाणानंतर एक आठवड्याने बोइंगच्या स्टारलायनर कॅप्सूलने पृथ्वीवर परतले पाहिजे होते.

पण स्टारलायनरच्या कॅप्सूलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नासाने रिकामी कॅप्सूलला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे विल्मोर आणि विलियम्स या दोघांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर सोपवली.

विल्मोर आणि विलियम्स यांना परत आणण्यासाठी नासाने काय बदल केले?

स्पेसएक्सने एका नव्या कॅप्सूलने दोघांना पृथ्वीवर परत आणण्याच ठरवलं. पण या मिशनच्या लॉन्चिंगला विलंब झाला.

त्यामुळे विल्मोर आणि विलियम्स यांचा अवकाश स्थानकातील कालावधी वाढला. आणखी 720 तासांनी विल्मोर आणि विलियम्स यांची घर वापसी होऊ शकते.

नासाने आता नव्या कॅप्सूलची प्रतिक्षा करण्याऐवजी नव्या मिशनच्या लॉन्चसाठी जुन्या कॅप्सूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्च पर्यंत मिशन लॉन्च करण्याचा उद्देश आहे.

जुनी कॅप्सूल एका खासगी मिशनसाठी देण्यात येणार होती. यामध्ये पोलंड, हंगेरी आणि भारताचे अंतराळवीर होते. या मिशनच वेळापत्रक बदलून पुढे ढकलण्यात आलं आहे.

त्यामुळे त्यामुळे विल्मोर आणि विलियम्स या दोघांची लवकर घरवापसी होऊ शकते

More news visit here : https://ajinkyabharat.com/kaveri-engine-project-fighter-jetsathi-bharat-swatch-engine-banavu-shakels-kuthparayant-pohochachalon-kaveri-engine-project/

Related News