हिवरखेडच्या भोपळे बंधूंचे सातासमुद्रापार यश

हिवरखेडच्या भोपळे बंधूंचे सातासमुद्रापार यश

अकोट (जि. अकोला) | प्रतिनिधी

निसर्गाचा ढासळलेला समतोल, बदलते हवामान आणि महागाईमुळे पारंपरिक शेती अडचणीत सापडलेली

असताना अकोट तालुक्यातील हिवरखेड येथील भोपळे बंधूंनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर यशाचे नवे पर्व रचले आहे.

इंजिनिअर अनिरुद्ध अरविंद भोपळे आणि कृषी पदवीधर तुषार राजेंद्र भोपळे यांनी वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड देत

नोकरीच्या मागे न लागता केळीच्या शेतीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातील केळीचे उत्पादन

थेट इराणला निर्यात करण्यात आले असून, यामुळे त्यांनी विदर्भातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

या यशामागे भोपळे बंधूंच्या मेहनतीसोबत आधुनिक पद्धतीने केळी लागवड, योग्य व्यवस्थापन,

व गुणवत्तेवर दिलेला भर आहे. यामध्ये अजिंक्य ताकीक व हनुमंत खबाले

यांनी त्यांच्या केळीला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आजही बहुसंख्य तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत नोकरीच्या शोधात भटकत असताना,

भोपळे बंधूंनी शेतीमध्येच रोजगार, आत्मनिर्भरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा मार्ग दाखवला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-shahrat-four-decades-by-aslelya-encroachment-hatwala-gela-busted/