हिवरखेड – शहरात मागील दहा दिवसांपासून स्थापित केलेल्या
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन आज (५ सप्टेंबर) शांततेत पार पडले.
वान नदी पात्रात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
वारखेडजवळील अकोला–बुलढाणा सीमेवरील वान नदीच्या पुलाजवळ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पाची आरती करून, प्रसादाचे वितरण केल्यानंतर भक्तांनी श्रद्धापूर्वक आणि उत्साहात आपल्या घरगुती गणपतींचे विसर्जन केले.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/auto-conductor-wine/