हिवरखेड येथील ओमशांती भवनात नशामुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम

"हिवरखेडात नशामुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम"

हिवरखेड  :  दि. 21 सप्टें रोजी ओमशांती भवनात “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत” हा उपक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते अजय बावणे (R.F.O.), श्री. विजयजी पंचबुदे (माजी P.S.I.),  श्यामशिल भोपळे, मंगेश दुतोंडे,  घुंगड मॅडम, कल्पना राऊत, डॉ.अभिजित उगले आणि प्रशांत ढोकणे.कार्यक्रमात व्यसनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांवर आधारित नाटिका सादर करण्यात आली. ब्रह्माकुमारी वैशाली दीदी (संचालिका, ओमशांती सेंटर) यांनी युवकांना व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी राजयोगाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.नाटिका सादर करण्यासाठी अंकित भाई, प्रणेश भाई, विजय भाई, नितीन भाई, कैलास भाई, श्याम भाई व वंदना ताई यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन सुलभा दीदी यांनी केले. हिवरखेडच्या तरुणांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.

read also : https://ajinkyabharat.com/tarun-talkit-name-ki-gale/