हिवरखेड येथील पत्रकाराला धमकावणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध पत्रकार बंधूंनी निवेदन दिले

अश्लील धमक्या, खोट्या गुन्ह्याची धमकी; पत्रकारांनी प्रशासनास दिले निवेदन

तेल्हारा :  तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड आणि खंडाळा फाटा येथील रखडलेल्या पुलांच्या कामामुळे अनेकदा राज्यमार्ग बंद पडत असून अपघातांची शृंखला सुरू आहे. यामध्ये एका आदिवासी युवकाचा मृत्यू झाला असून, त्याची नोंद हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.हिवरखेडच्या पत्रकारांनी या घटनांचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन केले असता पुलाचे बांधकाम करणाऱ्या एका उद्धट ठेकेदाराने पत्रकाराला भ्रमध्वनीवर धमक्या दिल्या, प्रत्यक्ष पुलाजवळ बोलावून अश्लील शिवीगाळ केली, तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.याप्रकरणी हिवरखेड आणि परिसरातील पत्रकार बंधूंनी जाहीर निषेध व्यक्त केला आणि ठेकेदाराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आदिवासी युवकाच्या मृत्यूसाठी ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचेही निवेदन पोलीस स्टेशनमध्ये सादर करण्यात आले आहे.निवेदन देण्यासाठी हिवरखेड आणि परिसरातील अनेक पत्रकार उपस्थित होते, ज्यात संदीप इंगळे, किरण सेदानी, महेंद्र कराळे, मनीष भुडके, गणेश सुरजोशी, सतीश इंगळे, रितेश टिलावत, संतोष राऊत, राजेश पांडव, सुरज चौबे, जितेश कारिया, अर्जुन खिरोडकार, राहुल गिऱ्हे, बाळासाहेब नेरकर, निलेश सपकाळ, गजानन राठोड, जितेंद्र लाखोटिया, अनिल कवळकार, सुनील बजाज, शाहरुख लाला, जमीर शेख, प्रदीप पाटील, जावेद खान, शहजाद खान, फारूक सौदागर, उमर बेग मिर्झा यांचा समावेश होता.सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ स्तरावरही पाठवण्यात येणार आहे. आता प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या उद्धट ठेकेदाराविरुद्ध कोणती कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/obc-madhyal-miscellaneous-samajache-neet-aani-maji-aamdarranchi-special-presence/