अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागातील तेल्हारा तहसीलमधील हिवरखेड भाग २ मध्ये
काम करणारा एक पटवारी त्याच्या वैयक्तिक सहकाऱ्यांसह अकोला एसीबीच्या सापळ्यात अडकला.
दरम्यान अकोला जिल्ह्यातील तेल्हाराच्या हिवरखेड येथील विनोद बापुराव आढे, ग्राम महसुल अधिकारी
अर्थात तलाठी आणि खाजगी व्यक्ती ऑपरेटर प्रमोद गुलाबराव इंगळे, यांनी जमिनीच्या नोंदींमध्ये बदल करण्यासाठी एका
शेतकऱ्याकडून १५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तळजळीअंती १० हजार देण्याचे ठरवले.
दरम्यान तक्रारदारास लाच द्यायचे नसल्याने त्याने अकोला एसीबी कडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पंचासमक्ष कारवाई करत तक्रारीनंतर अकोला
एसीबी चे पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर आणि पथकाने सापळा रचून पटवारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली.