अकोट – अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम सुरू असून,
त्याअंतर्गत हिवरखेड पोलीस आणि वनविभागाने संयुक्त कारवाई करत गुटखा माफियांवर मोठी धडक दिली.
या कारवाईत तब्बल ₹८,३३,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्राम झरी रेल्वे गेट परिसरात छापा टाकला असता एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
मात्र राहुल मनोहर इंगळे (२५, रा. इंदिरा नगर, हिवरखेड, ता. तेल्हारा) यास रंगेहात पकडण्यात आले.
त्याच्याकडून विमल गुटखा व सुगंधित तंबाखूची २,९६० पाकिटे (किंमत ₹३,२५,६००/-), दोन दुचाकी,
एक चारचाकी वाहन, मोबाईल अशा एकूण ₹५,०८,०००/- किमतीच्या
वस्तूंसह मिळून एकूण ₹८,३३,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पंचांसमक्ष नोंदवून आरोपीवर पोलीस ठाणे हिवरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यावर भारतीय दंड विधान कलमे २७३, २७४, २७५, १८८ तसेच अन्न सुरक्षा व
मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ) व ५९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या धडक कारवाईत स.पो.नि. गजानन राठोड, पो.उपनिरीक्षक गोपाळ गिलबिले,
हे.कॉ. विनोद खर्डे, प्रफुल पवार, पो.कॉ. आकाश गजभार, तर वनविभागाकडून
वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल ज्ञानेश्वर सोळंके, वनरक्षक मोहन कासदेकर व कु. सुरेखा पांडे यांनी सहभाग घेतला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,
अप्पर पोलीस अधीक्षक बि. चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Read also : https://ajinkyabharat.com/degavamidhye-rastyasathi-punha-aajan-nutrition-suru/