हिवरखेड मध्ये कावड यात्रा अत्यंत उत्साहात साजरी

हिवरखेड मध्ये कावड यात्रा उत्साहात

हिवरखेड : दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हिवरखेड शहरात कावड यात्रा अत्यंत

उत्साहपुर्ण वातावरणात काढण्यात आली यामध्ये हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला.

या कावड यात्रेमध्ये महाकालेश्वर शिवभक्त मंडळ 501 भरणे ,श्रीराम सेना शिवभक्त मंडळ 201 तर फत्तेपुरी संस्थान

च्या वतीने 101 भरण्याची कावड काढण्यात आली होती.

सोनवाडी फाट्या पासून ते श्री सदाशिव संस्थान पर्यंत ही कावड यात्रा काढण्यात आली.

हर बोला महादेव आणि महादेवाच्या गाण्यांवर नृत्य करीत शिवभक्त सहभागी झाले होते.

हर बोला महादेवाच्या गजराने हिवरखेड नगरी दुमदुमली. ही कावड यात्रा श्री सदाशिव संस्थान हिवरखेड पोहोचली यावेळी

महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करण्यात आला. हजारो शिवभक्तांनी जल अभिषेक करीत महादेवाचे दर्शन घेतले.

या कार्यक्रमाला गावातील दानशूर व्यक्तींनी शिवभक्तांसाठी फराळाचे तसेच चहापाण्याची व्यवस्था केली.

हिवरखेडचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांची संपूर्ण टीम यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता .

Read Also : https://ajinkyabharat.com/august-tabbal-closed-15-days-closed/