उन्हाळ्यात एसी-फ्रिजवर चोरट्यांचा डल्ला, पोलिसांची मोठी कारवाई

उन्हाळ्यात एसी-फ्रिजवर चोरट्यांचा डल्ला, पोलिसांची मोठी कारवाई

उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीचा फायदा घेत अकोल्यातील चोरट्यांनी एसी आणि फ्रिजवर

डल्ला मारल्याची घटना घडली आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका

इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या गोडाऊनमधून सहा एसी आणि चार फ्रिज चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती.

Related News

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ या आरोपीला

अटक केली असून त्याच्याकडून लाखो रुपयांचे चोरीचे एसी आणि फ्रिज जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असून,

या चोरीमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Related News